पिकुळे वखारवाडी ते देऊळवाडी रस्ता;युवक धडकले सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर
दोडामार्ग ता.१७-:* सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या मार्फत करण्यात येणाऱ्या पिकुळे वखारवाडी ते देऊळवाडी पर्यंत मंजूर झालेल्या रस्त्याचे मजबुती करण व डांबरीकरण गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण आहे.केवळ बीबीएम केले आहे.पुढील कामाचा पत्ता नाही त्यामुळे खराब रस्त्यामुळे हैराण झालेल्या पिकुळे गावातील युवक ग्रामस्थ यांनी दोडामार्ग बांधकाम विभाग कार्यालय येथे जाब विचारण्यासाठी धडकले.
यावेळी कुणी अधिकारी उपस्थित नव्हते.त्यामुळे संतालेल्या पिकुळे गावातील ग्रामस्थांनी पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोल सुरु केले आहे
