सावंतवाडी ता.११-:* शिक्षक मित्रांमधील अध्यापन विषयक नवीन जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख म. ला देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी गटसाहान केंद्राचे विषयतज्ञ गोपाळ गावडे यांनी विशेष गरजाधारक मुलांच्या अध्ययनातील अडथळे व उपायोजना सांगितल्या सुरेखा गावडे यांनी अध्यापनात विज्ञानपेटीचा वापर, नीता सावंत यांनी सामाजिकशास्त्र कल्पना व अध्ययन पद्धती या विषयावर इतर शिक्षकांना मार्गदर्शन केले तर केंद्रप्रमुख म ला देसाई यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले कुणकेरी शाळा नंबर 3 चे मुख्याध्यापक श्री मान्येकर यांनी सर्वांचे आभार मानले
