लाखे वस्ती सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती प्रथमताच साजरी होणार- रवी जाधव

सावंतवाडी ता.११-:* येथील श्री रासाई कला क्रीडा मंडळाच्या वतीने ह्या वर्षी प्रथमच 14 एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी भव्यदिव्य अशी जयंती साजरी करण्यात येणार आहे या जयंतीच्या कार्यक्रमासाठी विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रवी जाधव यांनी दिली

या जयंतीच्या कार्यक्रमासाठी रवी जाधव, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष अभिषेक लाखे , शाखाप्रमुख अमित लाखे, गणेश खोरागडे, संजय खोरगडे, विजय लाखे, सागर लाखे, नितेश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे तरी मंडळाच्यावतीने या जयंतीच्या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रवी जाधव यांनी केले आहे

You cannot copy content of this page