मंगेश तळवणेकर; अन्यथा २१ एप्रिलला गरिबांसाठी काढणार मोर्चा…
सावंतवाडी ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त वेगवेगळ्या आजारांवर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्ण असून ह्या रुग्णालयात मात्र औषधे पाणी व इतर सुविधांच्या बाबतीत रुग्णाचे हाल होत आहेत. या सुविधाची १८ एप्रिल पर्यंत पूर्तता करण्यात यावी अशी मागणी विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर सुविधांची पूर्तता न केल्यास 21 एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयापासून हजारोच्या संख्येने प्रांताधिकारी कार्यालयावर गरिबांसाठी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्दीस दिले असून यात असे म्हटले आहे की येथील उपजिल्हा रुग्णालयात फक्त डॉक्टर, स्ट्रेचर व बेड यांची उपलब्धता आहे आवश्यक सुविधांची मात्र बोंब आहे अपघाती रुग्ण, सापाने चावा घेतलेलेे रुग्ण व वेगवेगळ्या आजारावरचे रुग्ण यांना वाचविण्यासाठी रु.10 ची सुद्धा औषधे उपलब्ध नाहीत आयसीयु मधील एस.सी. बंद असून टाके घालण्यासाठी लागणारा धागा सुद्धा रुग्णालयात उपलब्ध नाही संपुर्ण सिंधुुुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त वेगवेगळ्या आजरावर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण येत असून रुग्णांना शौचालयात गेल्यावर पाण्याच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे अशा प्रकारे हे रुग्णालय अपुऱ्या सुविधांचे फटके रुग्णांना देत आहे यामुळे उपजिल्हा रुग्णालयात औषधे, सापाच्या विषावरील इंजेक्शने, पाणी व इतर सुविधा त्वरीत उपलब्ध करुन न दिल्यास सर्वसामान्य गरीब जनतेसाठी हजारोच्या संख्येने विठ्ठल रखुमाई संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे पुन्हा अगोदरच रात्री जमावबंदी आदेश लावू नये किती जणांना सरकारी औषधे व रुग्णालयाची गरज आहे हे मोर्चातून समजेल असे त्यांनी म्हटले आहे
