प्रथमेश कातळकर यांनी पटकावले सुवर्णपदक
सावंतवाडी ता.११-:* आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियमवर संपन्न झालेल्या ज्यूनिअर मास्टर इंडिया स्पर्धेत मळगांवचा सुपुत्र प्रथमेश कातळकर याने सुवर्णपदक पटकावले इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुनिल कुमार चौधरी आयोजित व फिटलाईन प्रायोजित ५६ व्या मास्टर मॅन्स् फिजिक चॅम्पियन स्पर्धेतील ६० किलो वजनी गटात त्याने हा किताब प्राप्त केला या स्पर्धेत देशभरातील एकूण २० स्पर्धक सहभागी झाले होते ८,९ व १० एप्रिलला ही स्पर्धा संपन्न झाली त्याच्या यशानंतर सुनिल कुमार चौधरी व मान्यवरांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील टीम शिवाजीच्या माध्यमातून प्रथमेश या स्पर्धेत सहभागी झाला होता यासाठी त्याला त्याचे प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी राजन जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रथमेश कातळकर हा सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचा सुपुत्र असून त्याने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये मोठे यश प्राप्त केले आहे सिधुदुर्ग ‘श्री ‘, वेंगुली ‘श्री ‘ कट्टा ‘श्री ‘ असे अनेक मानाचे किताब त्याने प्राप्त केले आहेत प्रथमेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे
