नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त वेर्लेत रक्तदान शिबिर

उत्स्फूर्त प्रतिसाद : रविंद मडगावकर यांनीही केले रक्तदान

सावंतवाडी ता.१०-: सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग , एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या वतीने वेर्ले जिल्हा परिषद शाळा न.2 येथे अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला तर केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर यांनी देखील रक्तदान केले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रकाश तेंडोलकर ,सुनील राऊळ, पंढरी राऊळ, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, बापू राऊळ, डॉ.संजीव लिंगवत,रामू सुतार,प्रसाद गावडे,तातो लिंगवत,निवृत्त पोलीस अधिकारी श्री.दयानंद गवस,साबा राऊळ, शिवा राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page