कणकवलीत मोकाट जनावरांच्या उपद्रवांमुळे भाजी व्यवसायिक त्रस्त

कणकवली ता.१०-:* कणकवली शहरात काही नागरिकांकडून गुरे मोकाट सोडली जात आहेत ही गुरे भाजी विक्रेत्यांच्या भाजीची नासधूस करत आहेत.या गुरांच्या उपद्रवांमुळे भाजी विक्रेते पुरते हैराण झाले आहेत.त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही उपाय योजना अथवा मोकाट गुरे सोडणाऱ्यावर न.पं. कडून कारवाई होत नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कणकवली शहरात डीपी रोड कॉर्नर,पटवर्धन चौक,तसेच उड्डाण पुलाखाली अशा आदी मोक्याच्या ठिकाणी भाजी विक्रेते भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.शहरात मोकाट गुरांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आहे.ही गुरे भाजी विक्रेत्यांची भाजीची नासधूस करत आहे.त्यामुळे भाजी विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत असून मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे त्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे.त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची त्याची आग्रही मागणी केली जात आहे त्यातच काही पशु पालक आपली गुरे मोकाट सोडत आहेत.या मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी भाजी विक्रेत्यांकडून केली जात असून या मागणीकडे मात्र संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने याचा फटका भाजी विक्रेत्यांना बसत आहे.

You cannot copy content of this page