असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या असलदे गावाला स्मार्ट नामांकन प्राप्त

कणकवली ता.१०-:* असलदे सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर यांच्या असलदे गावाला स्मार्ट नामांकन प्राप्त झाले असून त्याचे त्याचे प्रतिनिधित्व सरपंच वायंगणकर हे दिल्ली येथील विज्ञान भवन येथे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थित करणार आहेत.

या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागातंर्गत ११ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत ‘आयकॉनीक विक’ या कार्यक्रमात करणार आहेत या दिल्ली येथील होणाऱ्या कार्यक्रमांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच गावच्या सरपंचांना संधी मिळाली असून कणकवली तालुक्यातील असलदे गावचे सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर यांचा समावेश असल्याने पंढरी वायंगणकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

तसेच कुडाळ तालुक्यातील पंनदुर सरपंच तुकाराम साईल,वेंगुर्ल्याचे भोगवे सरपंच रुपेश मुंडये, दोडामार्ग तालुक्यातील कुंभरल गावचे सरपंच प्रवीण परब देवगडचे बापर्डे गावचे संजय लाड या गावच्या सारपंचांचा चा समावेश तसेच पणदुर भोगवे कुब्रल गामसेवक राठोड व शिंगाडे हे देखिल या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत

You cannot copy content of this page