कणकवली ता.१०-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे, पर्यावरण मंत्री तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शाखाप्रमुखपदी सिद्धेश तेली, उपशाखाप्रमुखपदी मंगेश नांदगावकर, केदार खोत, समीर कुंभार, ओमकार म्हाडेश्वर, उपशहरप्रमुख नसरुद्दीन पाटणकर, कासार्डे विभागप्रमुखपदी बबन मुगणेकर, कासार्डे उपविभागप्रमुखपदी समीर नावलेकर यांची युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी निवड केली आहे.
याबाबतचे नियुक्तपत्र शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना सुपूर्द करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतीश सावंत, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँकेचे संचालक व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रवींद्र तेली, भाई तोरसकर, प्रफुल्ल तोरसकर, इमान नावलेकर, गौस साठविलकर, महमंद साठवलिकर, शफिक साठविलकर, बंटी पाटील, राजा म्हसकर यांच्यासह युवासेनेचे व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
