भंडारी हायस्कुल माजी विद्यार्थी व महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे आयोजन
मालवण ता.०७-:* मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त तसेच भंडारी हायस्कुलच्या १९७१- ७२ च्या एसएससी बॅचच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १९७१- ७२ बॅच व महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य विभागस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा दि. १४ व १५ मे रोजी भंडारी हायस्कुल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत मुले व मुली एकेरी- ११, १३, १५ व १७ वर्षाखालील गट, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी व पुरुष ६० वर्षावरील असे गट आहेत. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धक आवश्यक आहेत. या स्पर्धेत सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी १२ मे पर्यंत प्रवेश नोंदणी करावी. नोंदणी व अधिक माहितीसाठी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर (८०८०२४८२०२, ९४२१२३६४४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
