सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित:कळसुलकर इंग्लिश स्कुलला दिली भेट;;अशोक इंगवले सुद्धा होते उपस्थित
सावंतवाडी ता.०७-:* शिक्षकाने सदैव ज्ञानोपासना करावी, असे भावपूर्ण उद्गार कळसुलकर इलिश स्कूलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवृत्त शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील निवृत्त माध्य. शाळा मुख्याध्यापकांची सदीच्छा भेट घेण्यासाठी काल माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित व माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक इंगवले कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे आले होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना दीक्षित सर पुढे म्हणाले, की वयाची पाऊणशे वर्षे होऊन गेलीलरी मी अद्याप विद्यार्थीच आहे. माझ्यातील शिक्षक अजूनही जिवंत आहे.
साक्षरता अभियान सारखे उपक्रम माझ्या सेवा. कालात या जिल्हयाने यशस्वीपणे राबविले जासे सांगुन सर्व शाळाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. इंगवले साहेब आपल्या भाषणात म्हणाले की, सावित्रीबाई फुले योजना,नवोपक्रम आदी योजना जिल्ह्यात राबविताना खूप आनंद आणि समाधान मिळाले. या जिल्ह्यात परतताना मला माहेरी आल्याचे सुख लाभते असेही इंगवले साहेब शेवटी म्हणाले.
प्रारंभी उपक्रमशील माजी मुख्याध्यापक अल्ताफ खान, सुरेश गवस आणि शिक्षण विस्तार अधिकारी पी.बी चव्हाण यांनी कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी दीक्षित साहेब व रंगवले साहेब यांनी शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी कल्पकतेने राबविलेले उपक्रम आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेचे गुणगान आपल्या भाषणात केले शाताराम गावडे (आरोस), सु.वि.गवस (माडखोल), वि.ना.आकेरकर (माणगाव), व्ही.बी.नाईक (सावंतवाडी), काका मांजरेकर (कडावल), सुभाष राणे (वाडोस) , अन्वर खान (बांदा), विकास गोवेकर व प्रदीप ढोरे (सावंतवाडी) या दोन्ही आदर्श अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्लातील अन्य मुख्याध्यापकांनीही दुरध्वनीवरून शुभसंदेश पाठविले. कळसुलकर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. तर जाभार प्रदर्शन कळसुलकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नारायण मानकर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अल्ताफ खान व भरत गावडे यांनी केले होते.
