आ.नितेश राणे; १८ जिल्हा परिषद व ३ नगरपंचायत क्षेत्रात होणार स्पर्धा
कणकवली ता.३०-:* कणकवली देवगड वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात “कमळ चषक २०२२ बॉक्स क्रिकेट स्पर्धा” १८ जिल्हा परिषद व ३ नगरपंचायत क्षेत्रात घेण्यात येणार आहे.पूर्ण एप्रिल २०२२ घेतली जाणार आहेत.युवा मोर्चा व जिल्हा परिषद सदस्य व भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाणार असल्याची घोषणा आ.नितेश राणे यांनी केली.
या क्रिकेट स्पर्धेची भाजपा मंडल अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी असेल.त्या त्या जिल्हा परिषद सदस्य यांना सर्व अधिकार असणार आहे.जागो जागी स्पर्धा असणार आहेत.गावागावात या स्पर्धा होत असतात, माझी संकल्पना आहे,तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माझा मानस आहे.स्थानिक क्रिक्रेटपटूच्या कौशल्याला वाव मिळावा.येत्या काळात टाईम टेबल जाहीर करणार असल्याचे आम. नितेश राणे यांनी सांगितले.
