मालवण ता.३०-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार दिवसेंदिवस महागाई वाढ करून जनतेची लूट करत असल्याच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकार विरोधात महागाई मुक्त भारतसप्ताह आंदोलन करत आहे. यापार्श्वभूमीवर दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता मालवणात फोवकांडा पिंपळ येथे गॅस सिलेंडर व दुचाकी वाहने यांना पुष्पहार घालून आंदोलन होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
तरी या आंदोलनास तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, सेल व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मेघनाद धुरी यांनी केले आहे.
