लोकांची माथी भडकवून दिशाभूल करायचे ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका
कणकवली ता.३०-:* विकासाच्या प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका ही नेहमीच बदलती राहिली आहे.प्रथम विरोध करुन ,लोकांची माथी भडकवून दिशाभूल करायचे आणि.मग स्वतःहून पाठींबा देण्यासाठी पुढे यायचे अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.नाणारसह विरोध असलेली गावे बाजूला करत नवी जागा एकत्र करुन ग्रीन रिफायनरी करावी.यासाठी माजी आ.प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत मंत्र्यांची भेट घेणार आहोत.
केंद्रीयमंत्री नारायण राणे, ना.धर्मेंद्र प्रसाद, ना.पुरी यांच्याशी चर्चा करून ग्रीन रिफायनरी प्रकल्प साकारणार असल्याचे सांगताना आम.नितेश राणे म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाला खास.विनायक राऊत यांचाच विरोध आहे हे स्पष्ट झाले असून खासदार राऊत यांना पक्षात काडीची किंमत राहिली नाही,असा टोला आ.नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आम.नितेश राणे यांनी आघाडी सरकारवर टीका करतानाच पर्यावरण मंत्री नाम. आदित्य ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठविली आम.नितेश राणे म्हणाले,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसु येथे ग्रीन रिफायनरी व्हावी,यासाठी केंद्राला पत्र दिले.त्यामुळे आता बारसु गावात सातबारा तपासणी करुन कोणाच्या जमिनी आहेत हे पाहण्याची वेळ आली आहे.
ग्रीन रिफायनरीला समर्थन वाढल्याने आदित्य ठाकरे व शिवसेनेची भूमिका बदलली आहे.आता नाणार नव्हे तर ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार,पण कुठल्या जागेत होणार हे केंद्र सरकार ठरवणार आहे,असा टोला आ.नितेश राणे यांनी लगावला.
जिथे जिथे वाद नाहीत, ते गाव घेऊन ग्रीन रिफायनरी व्हावी,असे आमचे मत आहे.मुख्यमंत्री यांनी पत्र दिले,त्यावर केंद्र निर्णय घेईल.केंद्रीय मंत्री नारायण राणे व ना. पुरी हे एकत्र निर्णय घेऊन हा प्रकल्प होईल.विरोधात लोक आहेत,त्यांची संख्या कमी आहे. केंद्राच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्प होईल.ना.राणेंशी मी सकाळी चर्चा केली आहे.प्रमोद जठार हे पहिल्या दिवसापासून ते काम करत आहेत.त्यामुळे त्यांना घेऊन आम्ही दिल्लीत जाऊ, त्या दिशेने आम्ही पाऊले टाकतो.मात्र सातबारावर बारसु गावात कोणाचे नाव आहेत?ते आम्ही तपासणी करणार असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दौऱ्यावर आले होते, केवळ टोमने मारुन बोलण्यासाठी आले होते का?पर्यटन मंत्री म्हणून व्यावसायिक लोकांशी बोलले का?दोन वर्षे कोरोना काळ होता.त्यांना दिलासा मत्र्यांनी दिला का? केवळ पक्ष बांधणीसाठी हा प्रवास केला.देवगडमध्ये आदित्य ठाकरे यांचा आवाज आहे कुठे?काहींनी ओरिजनल टायगर म्हणून बॅनर्स लावले. शिवसेना कुठे जिंकली?जिल्हा बँक गेली,ताकद लावून सुद्धा..! कुडाळ, देवगड या दोन ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या पाठींबा घेऊन सत्ता आहे.मला बाहेर ठेवून जिंकण्यात काय आहे ?मला वाटलं की देवगडची सत्ता बदलणं सोपं आहे.
माझ्या संपर्कात अनेक लोक आहेत.त्यामुळे पुढील काळात पाहू कसे करता येईल,असा इशारा शिवसेनेला आ.नितेश राणे यांनी दिला आहे. रिफायनरी व राजकारण याचा कोणताही संबंध नाही.भाजप वाढविण्यासाठी रिफायनरी ही टीका भास्कर जाधव यांची चुकीची आहे.सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून काय करणार?जी कमिटी केली,त्याचे सदस्य कोण असणार आहेत.ही योजना शिवसेनेसाठी केली आहे का?किती पैसे दिले आहेत?असे सवाल नितेश राणे यांनी व्यक्त करतानाच कॉग्रेसमध्ये तरुणांमध्ये किंमत कुठे? मी एकमेव आमदार कोकणातुन निवडून आलो होतो,राहुल गांधी हे आम्हाला केव्हाच भेटले नाहीत.त्यामुळे कॉग्रेसची अवस्था बिकट आहे,असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
