सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आपआपले रस्ते सुस्थितीत करावे

पावसाळ्या पूर्वी झाडी तोडावी, गटारे साफ करावी;राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची मागणी

कुडाळ ता 30: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गटार सफाई, रस्त्यातील खड्डे दुरुस्ती, रस्त्यांच्या कडेस वाढलेल्या झाडाच्या फांद्या,यांची डागडुजी व साफसफाई करण्याची सध्या गरज असून पावसाळा सिझन सूरू होण्या अगोदर संबंधित अधिका-यांनी यावर सकारात्मक निर्णय करणे आवश्यक असून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही कामे युद्ध पातळीवर हाती घ्यावीत व वाहनधारकांचा प्रवास सुखकारक होण्याकरिता प्रयत्न करावेत असे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सुचित केले आहे .

You cannot copy content of this page