जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदलले

सीईओ प्रजित नायर यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी ता ३० सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाचा प्राथमिक शाळा ३१ मार्च पासून सकाळच्या सत्रात ७ ते १२.३० या वेळेत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत . कोरोणा महामारी मुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी सकाळच्या सत्रात ७ ते दुपारी १२.३० या वेळेत शाळा सुरू ठेवण्याच्या आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार ३१ मार्च पासून सकाळी ७ ते दुपारी १२.३० पर्यंत सर्व शाळा सुरू राहतील. सोमवार ते शनिवार या दिवशी वेळापत्रकानुसार मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सकाळी ७ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. रविवारी ऐश्चिक स्वरूपात शाळा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात. व निकाल मे मध्ये जाहीर करण्यात यावा. असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर या आदेशात शाळेच्या तासिकाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये सकाळी ४ तासिका व मधल्या सुट्टीनंतर ५ तासिका अश्या एकुण ९ तासिका ३० मिनिटाच्या घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक सोमवार ते शनिवार परिपाठ सकाळी ७.१० ते ७ .२५ (१५ मिनिटे) १)७.२५ ते ८ .३० (३० मिनिटे) २)८.०० ते ८.३० (३० मिनिटे) ३)८.३० ते ९.००(३० मिनिटे) ४) ९.०० ते ९.३०(३० मिनिटे) मधली सुट्टी ९.३० ते १०.००(३० मिनिटे) ५)१०.०० ते १०.३०(३० मिनिटे) ६)१०.३० ते ११.००( ३० मिनिटे) ७)११.०० ते ११.३०( ३० मिनिटे) ८) ११.३० ते १२.००(३०मिनिटे) ९) १२.०० ते १२.३०(३० मिनिटे) अश्या प्रकारे अध्यापन तासिका वेळ निश्चित करण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page