वायंगणी मठात स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मालवण ता.३०-:* वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा रविवार ३ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहेत.

यानिमित्त पहाटे दुग्धाभिषेख,सकाळी सात वाजता नित्य आरती, दुपारी अकरा वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार हभप सौ सुजल पाटकर मुंबई यांचे किर्तन होणार आहे. दुपारी महाप्रसाद, सायंकाळी चार ते रात्री आठ पर्यंत स्थानिकांची भजने होणार आहेत. रात्री दहा वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ नेरुर प्रस्तुत ट्रिकसिन युक्त दशावतार अजिंक्य तारा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सदा राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page