मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा बांधकाम विभागावर आरोप…
सावंतवाडी ता.३०-:डोंगरी विकास कामांची नवीन शासन निर्णयाप्रमाणे १० लाख पर्यंतच्या कामांची आपण यादी मागवून घेतली असल्याची माहिती सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली आहे. आज सावंतवाडी येथे येऊन त्यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यानं संदर्भात चर्चा केली होती. यावेळी त्यांनी रस्त्यांसाठी मधल्या काळात आलेला निधी मर्जीतल्या ठेकेदारांना देण्यात आला असल्याचा आरोप देखील बांधकाम विभागावर केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर, संतोष भैरवकर, बाबल गावडे,संदेश शेट्ये, सुंदर गावडे, आकाश परब, अभय देसाई,मंदार नाईक,नंदू परब विष्णू वस्कर, विश्वनाथ राउळ, आदी उपस्थित
यावेळी ते पुढे म्हणाले की, काही जुनी कामे सुरू आहेत. त्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. परंतु, या कामांना उशीर केल्याबद्दल कोणत्याही ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आले नसून, वाढीव दर देण्यात आले आहेत. याबाबत आपण माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ते पुढे म्हणाले की, दोडामार्ग रस्त्यासाठी काही महिन्यांपूर्वी सर्व पक्षीयानी एकत्र येऊन आवाज उठवला होता. तो रस्ता पूर्ण करण्यासाठी मार्च एनड ची वाट का पहिली जात आहे. असा सवाल उपस्थित केला आहे.
