जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची उपस्थिती;व्हाईस चेअरमनपदी गुरुनाथ सावंत-भोसले यांची निवड
सावंतवाडी ता.३०-: येथील माजगाव विकास विविध सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया आज निवडणूक निर्णय अधिकारी नंदिनी सामंत यांच्या उपस्थित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी श्री दळवी बोलत होते यावेळी नवनिर्वाचित चेअरमनपदी विष्णू गावडे, वाईस चेअरमन पदी गुरुनाथ सावंत भोसले यांची तर सचिवपदी शशिकला दळवी यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर पंचायत समिती माजी सदस्य बाबू सावंत सरपंच दिनेश सावंत ग्रामपंचायत सदस्य संतोष उर्फ बाळा वेजरे सुधीर सारंग पोलीस पाटील विनोद जाधव अजय सावंत मंगेश राठोड आबा सावंत आदी उपस्थित होते
