कर्मचारी-रुग्णांमधून व्यक्त होतेय समाधान
सावंतवाडी ता.२८-:* येथील उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे गेली अनेक वर्षे रस्त्याचा भेडसावणारा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने रूग्णालय प्रशासनासह रुग्णांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
येथील उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याची पूर्णतः चाळण झाली होती परिणामी याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत होता रुग्णाचे होणारे हाल पाहता रुग्णाच्या नातेवाईकांकडुन याबाबत नाराजीचे सूर उमटत होते गर्भवती महिलांना जुन्या इमारत व नवी इमारत याठिकाणी स्ट्रेचर वरून ने आण करताना असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता सामाजिक बांधिलकी तसेच सामाजिक संघटनांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले होते यानंतर सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून 26 जानेवारी रोजी उपोषण पुकारण्यात आले होते यानंतर या रस्त्याच्या दंबरीकरणासाठी साडेसात लाखाचा निधी मंजूर झाला यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले
निधी मंजूर होताच 19 मार्च रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यानंतर आज पासून या अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण दांबरीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे यामुळे भेडसावणारा खड्डेमय रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून रुग्ण तसेच रुग्णालय प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे रुग्णालयाच्या आवारातील रस्त्यासह मुख्य रस्त्यापासून रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे त्याबरोबर रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी वाढलेली झाडी हटविण्याचे काम देखील चालू आहे
