कणकवली ता.२८-:* विद्रोही साहित्यिक उत्तम पवार यांच्या स्मृतिनिमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 9 एप्रिल रोजी कणकवली बुद्धविहार येथे सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे.
विद्रोही साहित्यिक उत्तम पवार यांचा 9 एप्रिल हा जन्मदिवस. दुर्दैवी अपघातात अकाली मृत्युमुखी पडलेल्या उत्तम पवार यांनी दर्पण प्रबोधिनी संस्था स्थापन करून वंचितांच्या दबलेल्या आवाजाला हुंकार दिला होता. उत्तम पवार यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करून संस्थेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन दर्पण प्रबोधिनी च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ.अशोक कदम मोबा. 9422373590 / संदेश कदम मोबा. 9922696771 / राहुल कदम मोबा. 7744073791 / विशाल कासले मोबा. 8411098061 / गौरव कदम मोबा. 7588449763 / अजित तांबे – 9423365943 यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
