शिवसेनेच्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण ता.२६-:* आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ३५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीत ज्यांना मोतीबिंदू समस्या आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी, हृदयरोग तपासणी आणि रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या तपासणीसाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. या शिबिरात २९८ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

यातील ४० जणांवर जिल्हा रुग्णालयात डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत जे. जे. हॉस्पिटल मुंबई च्या नेत्र शल्य चिकीत्सा विभाग प्रमुख डॉ. राघिनी पारेख यांच्यासह १५ तज्ज्ञ डॉक्टरांकडून सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर ४८ जणांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यातील २० जणांना पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार होणार आहेत. आमदार वैभव नाईक यांनी या आरोग्य शिबिरास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांसह शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page