पाच विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी ठरले पात्र…
सावंतवाडी ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांचे मार्फत दिनांक 6 मार्च 2022 रोजी गणित प्राविण्य परीक्षेचे आयोजन कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एस. एल. देसाई विद्यालय पाटचे सहावीचे 9 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 3 विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
यामध्ये कुमार स्वयम अमृत महाडिक (70/100), कुमारी दिया निलेश सामंत ( 52/100 ), कुमार सौमित्र सुधीर मळेकर ( 50/100 ) यांनी घवघवीत यश संपादन केले. तर इयत्ता आठवी व नववीचे 6 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 2 विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये कुमार पार्थ सतिश गोसावी (62/100 ), कुमार आदित्य रमाकांत नाईक (45/100) यांनी सुयश प्राप्त केले आहे. वरील सर्व यशस्वी मुलांना विद्यालयाचे गणित शिक्षक श्री. आर एन ठाकूर व श्री. विनायक कांबळे तसेच शाळेतील गणित शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था तसेच मुख्याध्यापक श्री. शामराव कोरे, पर्यवेक्षक श्री. राजन हंजनकर यांनी अभिनंदन करून, पुढील प्रज्ञा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
