चाफेली युवासेनेच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम…
सावंतवाडी ता.२७-:आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाफेली युवसेने तर्फे चाफेली येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पिंट्या उबारे- घावणाळे मतदार संघ युवा सेना उपविभाग प्रमुख, रितेश परब- चाफेली युवा सेना शाखा प्रमुख, योगेश सावंत – माजी सरपंच हळदीचे नेरूर -चाफेली, विजय परब- शिवसेना शाखा प्रमुख चाफेली, गणपत परब , सन्मेश परब, संदेश तोरसकर, नामदेव सुद, सचिन सुद, परशुराम सावंत , संदीप आडवे, लक्ष्मण सावंत, अनंत परब, प्राथमिक शिक्षक श्री खोचरे आदी उपस्थिती होते.
