तळवडे येथून १२ बकऱ्यांची अज्ञाताकडून चोरी…

अज्ञाताविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

सावंतवाडी ता 27: तळवडे जोशीवाडी येथील खुलेशेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या एकूण 42000 किंमतीच्या तब्बल १२ बकऱ्या अज्ञाताने चोरट्यांनी चोरी केल्या हा प्रकार आज सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आला मुकुंद बाबूराव आंगचेकर वय 50 रा परबवाडी असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित चोरट्याने मात्र 3 शेळ्या 8 पिल्ले तिथेच ठेवली आहेत

आंगचेकर यांची तळवडे जोशीवाडी येथे शेती आहे त्याठिकाणी त्यांनी 2019 पासून खुला शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता रोजच्याप्रमाणे काल रात्री 8 च्या सुमारास ते शेळ्यांना खाद्यपदार्थ घालून घरी गेले मात्र सकाळी 7 च्या सुमारास गोठ्यात परतले असता गोठ्यातील 12 बकऱ्या त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले यावेळी त्यांनी परिसरात पाहणी केली असता कुठे ही बकऱ्या दिसून आल्या नाहीत यानंतर त्यांनी शेजारील घरात चौकशी केली असता रात्री 10 30 च्या सुमारास शेळ्या व कुत्रे भोकण्याचा आवाज आल्याचे सांगितले यावेळी रात्री शेतमाळ्यातील गोठ्यावर कुणी नसल्याची संधी साधून चोरट्याने शेळ्या चोरी केल्याची आंगचेकर यांना खात्री पटली यात त्यांच्या तब्बल 3 बकरे व 9 शेळ्या असे सुमारे 42000 रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत पोलीस त्यांनी खबर दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री भागवत व पोलीस मनीष शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला मातीत रस्त्याच्या दिशेने बकर्यांच्या पायाचे ठसे उमटले आहेत

You cannot copy content of this page