शिवजयंती निमित्त भव्य शिवज्योत दौड संपन्न

जाणता राजा प्रतिष्ठान भोमचे आयोजन

वैभववाडी ता.२८-:* जाणता राजा प्रतिष्ठान भोम यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त भव्य शिवज्योत दौडचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवज्योत दौड प्रारंभ सकाळी ८.३० वाजता सुरू झाली. सौ. अनिता जाधव, सौ. रेश्मा जामदार, सौ. अंजनी जाधव, सुप्रिया जाधव, सौ. आनंदी जाधव यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत करण्यात आली.

त्यानंतर भोम, मौदे, आखवणे, हेत, उपळे, तिरवडे, भुईबावडा अशी भव्य शिवज्योत दौंड काढण्यात आली.याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन महाराजांना अभिवादन करण्यात आले.या दौडमध्ये जाणता राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी,गावातील युवक, युवती पारंपरिक वेषात हातात भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले होते.छञपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी ! अशा जयघोषणांनी कार्यकर्यांनी परिसर दणाणून सोडला.

सायंकाळी ५. वाजता हरिपाठ ह. भ. मारुती महाराज भालेकर, ह. भ. प. विश्वास महाराज जामदार, श्री. रामकृष्ण जामदार, मृदूंग वादक रामचंद्र महाराज सुर्यवंशी आदी महिला व ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग होता. या हरिपाठात जाणता राजा प्रतिष्ठानचे सर्व सभासद उपस्थित होते.

You cannot copy content of this page