कोलगाव मेळाव्यात हिराताई पवार यांचे प्रतिपादन : उत्पन्नाचे साधनासाठी मशनरी पुरवणार
सावंतवाडी ता.२८-: सुपारीची मागणी आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात असून, सुपारीचे उत्पादन घावे, सुपारी कटिंग करण्यासाठी लागणारी मशीन आम्ही तुम्हाला पुरवू, या माध्यमातून तुम्हाला एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच लसणाला देखील चांगला भाव मिळत असून, त्याचे देखील उत्पादन घ्यावे, त्यासाठी देखील लागणाऱ्या मशीन आम्ही तुम्हाला पुरवू, यासारख्या अनेक व्यवसायातून स्त्रियांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन हिरकणी नारीशक्ती ब्रिगेडच्या अध्यक्षा हिराताई पवार यांनी कोलगाव येथे आयोजित मेळाव्यात बोलताना केला आहे.
यावेळी त्यांनी उपस्थित स्त्रियांना उद्योग, व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सक्षम करण्यासाठी स्त्रियांनीच पुढे येऊन व्यवसाय केला पाहिजे असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
