मालवण ता.२६-:आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त असगणी येथील शाळा नं १ व कुस्थळवाडी शाळा या प्रशालेतील मुलांना आडवली माडली मतदार संघाचे विभाग प्रमुख बंडु चव्हाण व असगणी सरपंच हेमंत पारकर व शाखा प्रमुख देवेंद्र पुजारे यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच यशवंत राऊत, शाखा प्रमुख देवेंद्र पुजारे,शालेय समिती अध्यक्ष सुर्वणा कासले,माजी सरपंच रामचंद्र राऊत, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुमीञा कासले , ग्रामपंचायत सदस्य अर्पीता पुजारे, शिवसेना बुथ प्रमुख बंडु कासले,देवयानी पुजारे , दर्शना चव्हाण, अनुराधा चव्हाण,प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.ए.वंळजु,राहुल मेश्रा,शारदा वालावलकर,हे उपस्थित होते
