शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजन
देवगड ता.२६-:* देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता देवगड किल्ला ते स्वामी समर्थ मंदिर (ग्रामीण रुग्णालय देवगड) पर्यंत भव्य शोभा दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दिंडीत ढोल पथक ,महिला लेझीम पथक, वाडा हायस्कूल मुला मुलींचे लेझीम पथक ,गुजराती महिला गरबा नृत्य व विविध कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच खास आकर्षण म्हणून १० ते १२ वयोगटातील मुला मुलींची फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. तरी इच्छुक स्पर्धकांनी खालील मोबाईल वर संपर्क साधावा . देवगड परिसरातील सर्व नागरिकांनी सदर शोभा दिंडीत बहुसंख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे. शोभा दिंडी स्वामी समर्थ मंदिराच्या आवारात येऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. स्पर्धकांनी देवगड बाजारपेठ येथे भाई सावंत यांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याचे आहे . संपर्का करिता विलास रुमडे ९४२३३००००४, विजय जगताप -९८६०९२६५६७ सौ शामल जोशी -९४२२६९२१८४ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अध्यक्ष निशिकांत साटम यांनी केले आहे.
