कणकवली कॉलेज वनस्पतीशास्त्र विभागामार्फत पारगड येथे अभ्यास सहल
कणकवली ता.२३-:* कणकवली कॉलेज कणकवली वनस्पतीशास्त्र विभाग यांच्यामार्फत नुकतेच किल्ले पारगड या ठिकाणी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते ऐतिहासिक वारसा असलेल्या या किल्ल्याच्या अवतीभवती असलेल्या वनसंपदेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. कोरोनामहामारी च्या काळामध्ये अभ्यास सहलींना पूर्णविराम लागला होता आता हळूहळू अभ्यास सहलींना सुरुवात होत आहे.
ऑनलाइन आणि कंटाळवाणे झालेले शिक्षण यातून विद्यार्थ्यांना व तरुणाईला निसर्ग अनुभवता यावा व अनुभवातून शिक्षण म्हणजे काय हे समजावे यासाठी कणकवली कॉलेज वनस्पतीशास्त्र विभाग यांचेमार्फत या अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे दक्षिण टोक आणि कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव पारगड किल्ला त्याचा ऐतिहासिक वारसा आणि अवतीभवती असणारे सदाहरित वनराई त्यामुळे ठिकाणाची निवड करण्यात आली.
अभ्यास सहल प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वनस्पती अभ्यासल्या दिंडा दिंडी तीवरी डायदौला करवंद बला पारळ शेरवड फातरफोडी अक्कलकाढा खुळखुळा भोगनळ अशा प्रकारच्या अनेक वनस्पतींचा अभ्यास करता आला. अभ्यास सहल प्रसंगी प्रा डॉ गावडे यांनी विविध वनस्पतींची ओळख व उपयोग यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांचे जतन करणे का महत्त्वाचे आहे हे समजावले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पारगड चा ऐतिहासिक वारसा ही समजून घेतला. या अभ्यास सहलीचे नियोजन विभाग प्रमुख प्रा. डॉ. गावडे, प्रा उमरीकर कु. सानिका राणे श्री. भोगले यांनी प्राचार्य डॉ राजेंद्रकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या अभ्यास सहलीमध्ये 39 विद्यार्थी सहभागी झाले.
