शासनाच्या ई मार्केटिंगद्वारे जिल्हा परिषदेने खरेदी केले वाहन

ओरोस ता.२३-:शासनाच्या ई मार्केटिंग या खरेदी साईड वरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने प्रथमच वाहन खरेदी केले आहे. होंडा अमेझ हे वाहन खरेदी करण्यात आके असून नोव्हेंबर २०२१ मध्ये याची बुकिंग करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ताफ्यात आणखी एक वाहन सामील झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून ही खरेदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सीईओ, अतिरिक्त सीईओ, सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महिला व बालकल्याण सभापती, समाजकल्याण सभापती यांना स्वतंत्र वाहने सुस्थितीत आहेत. तर शिक्षण-आरोग्य आणि वित्त-बांधकाम सभापती याना वाहन आहे परंतु ते सुस्थितीत नाही. तसेच उपाध्यक्ष यांना भाड्याने वाहन देण्यात आले होते. सध्या पदाधिकारी कार्यरत नसलेतरी त्यांच्यासाठी वाहने मंजूर आहेत.

ही वाहने खरेदी करून दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा दोन लाख ४० हजार किलोमीटर चालल्यानंतर निर्लेखन करता येतात. अध्यक्ष याना अकरा लाखांपर्यंत किमतीचे वाहन खरेदी करता येते. सीईओ यांना ९ तर उपाध्यक्ष यांच्यासह सर्व सभापती व अधिकारी यांना ८ लाख किमतीचे वाहन खरेदी करता येते. शासनाच्या ई मार्केटिंग वरून खरेदी करण्यात आलेले होंडा अमेझ हे वाहन थेट शासनाकडून खरेदी करण्यात आल्याने त्याची किंमत कमी झाली आहे.

You cannot copy content of this page