महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२६५ रुग्णांनी घेतला लाभ;राजू मसुरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

सावंतवाडी ता.२३-:* अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक २० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात सावंतवाडी तालुक्यातील 265 रुग्णांनी तपासणी करून देण्यात आली आहे. या शिबिराचे उद्घाटन जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरात हृदय विकार, कॅन्सर, मणक्याचे आजार, गुडघ्याची शस्त्रक्रिया, मुतखडा शस्त्रक्रिया, मूत्र विकास हाडांची शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारची रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दैव्या सूर्याजी डॉ. राहुल चौगुले मा .मदन गोरे मार्केटिंग हेड मा.अक्षय सुतार मा.जमील मनियार मा.दिनेश दावले मा.विजय हराळे मा.प्रशांत पडते मा.सुरेश शिरोडकर सौ . सिद्धी हरमलकर आदींनी या शिबिरात सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page