रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक जल दिन साजरा…

वैभववाडी प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. मानवासोबतच वनस्पती व प्राणीमात्रासाठी पाणी हे जीवन आहे. याची जाणीव जनमानसांमध्ये निर्माण व्हावी व पाण्याचा योग्य वापर होऊन अपव्यय टाळावा याची जनजागृती व्हावी यासाठी या दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे कसाल मध्ये रॅली काढण्यात आली.

यामध्ये कसाल ज्युनियर कॉलेज च्या मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. डाॅ.कोलते यांनी उपस्थित मुलांना संबोधित करताना पाण्याचे महत्त्व सांगून, पाणी वाया जाऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया, असे आवाहन केले. जलप्रदूषण टाळल्याने बरेचसे आजार आपण दूर ठेवू शकतो असे सांगितले. अवधूत मालणकर यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमासाठी प्राचार्य गुरूदास कुसगावकर, संदीप गोळवणकर, गणेश सावंत यांचे सहकार्य लाभले. रो.उदयकुमार जांभवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. फोटो : कसाल येथे जागतिक जल दिन साजरा करताना रोटरी क्लब सेंट्रल चे पदाधिकारी व विद्यार्थी.

यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रो.डाॅ.प्रशांत कोलते, सचिव रो.उदयकुमार जांभवडेकर, रो.प्रभाकर सावंत, रो.रविकमल डांगी, रो.भालचंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते अवधूत मालणकर उपस्थित होते. कसाल एस टी स्टॅन्ड येथून रो.भालचंद्र सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पाण्याचे महत्त्व, संवर्धन यावर आधारित घोषणा देत कसाल बाजारपेठेतून सिद्धिविनायक मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page