कंटेनर पुलावरून नदीत कोसळला अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू

कणकवली 23 मार्च (प्रतिनिधी)-खारेपाटण सुखनदीच्या पुलावरून तब्बल 80 फूट खाली कंटेनर पुलावरून नदीत कोसळला. 22 मार्च रोजी रात्रौ 11:20 वा. चे मानाने हा अपघात घडला.या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे.

खारेपाटण तपासणी नाक्याचे समोर सुक नदी च्या पुला वरून भारत बेंज कंपनीची ट्रक नं.एम.एच.47-ऐ.एस.2266 कणकवली कडून रत्नागिरी कडे जात असताना खारेपाटण सुखनदीच्या पुलावरून 80 फूट खाली कोसळला सदर अपघाताचे ठिकाणी तात्काळ खारेपाटण चेक पोस्ट वरील पोलीस अंमलदार उद्धव साबळे व वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थानी मदती करीता धाव घेऊन अपघातातील दोन जखमींना तात्काळ बाहेर काढुन उपचाराकरीता खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे घेवुन गेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.सरस्वती कोळी यांनी त्यांना तपासुन मयत घोषीत केले.

मयतामधील एकाची ओळख पटली आहे. सदर ठिकाणी तसेच डी. वाय.एस. पी विनोद कांबळे कणकवली यांनी भेट देऊन अपघातग्रस्त ठिकाणची पहाणी केली. नदी मध्ये पाण्याचा प्रवाह असल्यामुळे ट्रक बाहेर काढण्यास आडथळा येत होता.

You cannot copy content of this page