सावंतवाडी ता.२२-:* वेर्ले गावचे रहिवासी तथा माजी सैनिक कै. कृष्णा म. राणे यांचे कालच दुःखद निधन झाले असून, गावातील आजी माजी सैनिक संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाच्या दुःखाद सहभागी होऊन कुटुंबाचे सात्वन केले आहे.
कृष्णा राणे यांनी १९७१ साली झालेल्या बांगलादेश स्वतंत्र युद्धात (भारत – पूर्वीचे पाकिस्तान आणि आताचे बांगलादेश) आपल्या शौर्य आणि साहसाने कर्तव्य बजावले होते. त्यांनी अखंड २४ वर्ष आपल्या देशाची सेवा करून भारतीय सैन्य दलाच्या जंगी पलटण मधून नाईक सुभेदार या पदावरून ते सेवा निवृत्त झाले होते. यावेळी उपस्थित सर्व आजी माजी सैनिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
