“स्वस्थ जीवनशैली आणि ग्रामीण पुनर्रचना” कार्यक्रमासाठी अशोक गुप्ता कडून सॅनेट्री पॅड्स भेट…

आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणार आहे उपक्रम…

सावंतवाडी ता.२३-: भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “स्वस्थ जीवनशैली आणि ग्रामीण पुनर्रचना” साठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब, सावंतवाडीने माजी अध्यक्ष, चितार आळी सार्वजनिक गणेशोत्सवचे अध्यक्ष आणि दानशुर व्यक्ती श्री.अशोक गुप्ता यांच्या दातृत्वातुन “सॕनेट्री पॕड्स” देण्यात आली.

रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार यानी सांगितले. स्री आत्मनिर्भर व्हावी या दृष्टीने उचललेले हे एक पाऊल आहे असे ते म्हणाले. यावेळी चितार आळी सार्वजनिक गणेशोत्सवचे अध्यक्ष श्री.अशोक गुप्ता, श्री.मंदार नार्वेकर, रो.आनंद रासम, रो.दिलीप म्हापसेकर, रो.प्रमोद भागवत, रो.सत्यजित धारणकर भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी -राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यार्थीनी कु.दीपाली पवार आणि प्रशांत नवले उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page