आम. केसरकरांच्या वक्तव्याचा कृती समितीकडून निषेध        

आंबोली ता.२०-:* आंबोली कबुलायतदार गावकार जमिन प्रश्नी आमदार केसरकर यांनी केलेल्या वकतव्याचा कबुलायतदार व कृती समितीने निषेध केला आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आ. केसरकर 12 वर्षे आमदार व तिन्ही वेळेला सत्ताधारी पक्षात व पालकमंत्री सुद्धा होते तरीही प्रश्न प्रलंबिक का राहीला हे आता येथिल जनतेला समजले आहे. आंबोली गाव केसरकरांना दत्तक दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी नाहक त्रास अधिकारयांना देउ नये.

आंबोली ही कोणाचीही जहागिरदारी नाही आहे. आंबोली कबुलयतदार गावकर जमीन प्रश्नावर गावकऱ्यांनी जो निर्णय घेतील तो गावचा असेल यात आमदार असो किंवा खासदार असो किंवा राजकीय कोणताही पुढारी असो त्यांनी आंबोली गावच्या जमीन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा नाकी त्यात अडथळे आणू नये आज बावीस वर्ष या प्रश्नाला झाली यात दीपक केसरकर यांनी जी मदत केली त्यांच्या आम्ही शतशः ऋणी आहोत यापुढे आंबोली गाव जमीन प्रश्न येथील सर्व गावकरी व ग्रामस्थ निर्णय घेतील यासाठी कोणीही अधिकाऱ्यांना वेठीस धरू नये जे अधिकारी जमीन प्रश्न सोडवण्यासाठी गावाच्या बाजूने आहेत त्यांना नाहक त्रास देऊ नये. कारण जमीन आमच्या हक्काची आहे. कुणाच्या कुणाच्या बापाची नाही. यावेळी श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, रामचंद्र गावडे उल्हास गावडे, मनोहर बंड,चंद्रकांत गावडे,प्रकाश गावडे, विकास गावडे,संतोष पालेकर, भिमसेन गावडे, बाबुराव सावंत व  सरपंच बाळा पालेकर व उपसरपंच दत्तु नार्वेकर आदी कबुलायतदार कृति समिती सदस्य, कबुलायतदार व ग्रामस्त व मुख्य गावकार उपस्थित होते.

You cannot copy content of this page