अक्रम खान म्हणजे हवा का झोका आणि जादूची कांडी…

संजू परब; सावंतवाडी भाजप तर्फे वाढदिवस साजरा

सावंतवाडी ता.२०-:* अक्रम खान म्हणजे हवा का झोका आणि जादूची कांडी तो कधी काही करेल कुठची गणित कुठे जुळवेल याचा थांग पत्ता न लागू देणारा, म्हणजे अक्रम खान असे गौरवोद्गार सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले आहेत.

यावेळी बोलताना परब पुढे म्हणाले की अक्रम खान ही अशी व्यक्ती आहे जी लोकांच्या वेळ प्रसंगाला व संकटाला धावून जाणार आहे. कोरोनाच्या काळात लोकांना आलेले अतिप्रसंग ची वेळ आणि अक्रम खान यांनी केलेलं काम हे कधीही न विसरता येणारे आहे. असेही परब या वेळी म्हणाले आहेत. श्री अक्रम खान यांचा वाढदिवस आज सावंतवाडी भाजपच्यावतीने केक कापून साजरा करण्यात आला यावेळी श्री परब बोलत होते.

यावेळी अँड.अनिल निरवडेकर, नेमळे ग्रामपंचायत सरपंच विनोद राऊळ, बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, संदीप बांदेकर, ज्ञानेश्वर सावंत, साईल कल्याणकर, समीर पालव, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page