हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवलीतर्फे २ एप्रिलला स्वागतयात्रा

कणकवली ता.२०-:* हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली , आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२२ शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे .स्वागतयात्रा प्रारंभ कणकवली पंचायत समिती जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाजत गाजत पटवर्धन चौकात येईल व बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे समारोप होणार आहे.

नववर्षाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करण्यासाठी पारंपारिक वस्त्रे लेवून उत्साहाने स्वागत यात्रेत सहभागी व्हावे. यावेळी१)भारत माता वेशभूषेचा रथ / बैलगाडी ,२) ध्वजपथक ( ओम असलेले भगवे झेंडे ) ३) लेझीम पथक ४ ) ढोल पथक ५ ) नागरीक संचलन ६ ) दुचाकी पथक ७ ) वारकरी दिंडी ८ ) भारतातील हिंदू संस्कृतीतील पारंपारिक वेषभूषेतील हिंदू धर्माभिमानी यांचा सहभाग असे यात्रेचे स्वरूप राहणार आहे. अधिक माहितीसाठी सुमनराज ट्रेड सेंटर,मधुबन लॉज जवळ , , पेट्रोलपंप समोर , कणकवली संपर्क क्रमांक – ९ ८६०३०४२२४, ७९७२७७३८३१ , ९ ४२०२६१७६३ येथे संपर्क साधावा असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page