“फोंडा हायस्कूल ७४-७५ च्या बॅच चा स्नेहसोहळा यादगार
कणकवली ता.२०-:* मैत्रीचा शाळा संपल्यानंतर ४० वर्षांनी, “बचपन के दोस्त” ग्रूप अस्तित्वात आला.आणि फोंडाघाट हायस्कूल ७४-७५ च्या बॅच चा स्नेहसोहळा यादगार ठरला. गेल्या ४वर्षात तो बहरतोय आणि आज त्याचा स्नेहमेळावा मैत्री- कणकवलीत पार पडला.कुमार नाडकर्णी यांनी मेळाव्याची रूपरेषा आपल्या सूत्रसंचालनात प्रकट केली. १९७४-७५च्या बॅचच्या स्नेहामेळाव्यानिमित्त आपल्या कामातून निवृत्तीची वेस पार केलेल्या मित्रमैत्रिणींच्या स्नेहमेळाव्याची सुरुवात, सोडून गेलेले गुरुजन कर्मचारी मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर उत्सवमुर्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मेळाव्यास उपस्थित असलेल्या तरी वयोमानपरत्वे चेहरे बदललेल्या मित्र-मैत्रिणींनी आपली ओळख करून देताना, आजवरचा जीवन प्रवास उलगडून सांगितला.
डाॅ. अजित सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात, ग्रूप निर्माण करणाऱ्या सुरेश कुडतरकर, उज्वला सामंत, सन्मती डोर्ले,यांचे कौतुक करून त्यामागची संकल्पना स्पष्ट केली.साठी नंतरची भेट -मौजमजा आणि ऊर्जा घेऊन जातानाची अनुभूतीचा विलक्षण संगम, म्हणजेच स्नेहमिलन ! यातून अधिक चांगल्या सूचना पुढे याव्यात, यासाठी आता आपली काळजी आपणच घ्यावी. आहार- विहार- व्यायाम- योग अंगीकारणे हाच, आज टेन्शन फ्री होण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील कोरगावकर, विनय सामंत,विजय(बाळा) वणकुद्रे आणि दिगंबरआण्णा रावराणे व सौ रमा नाडकर्णी यांचा वाढदिवस शुभेच्छा देत साजरा करण्यात आला. दुसरे दिवशी सकाळी घावने-चटणीच्या कोकणी नाष्ट्याचा आस्वाद घेऊन “बचपन के दोस्त” चा वर्ग भटकंतीला बाहेर पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर “रिटायर्ड बट, नॉट टायर्ड “चा आनंद-आत्मविश्वास अधोरेखित करीत होता.
सर्वप्रथम आडवली गावातील श्री स्वामी समर्थांच्या विलोभनीय- श्रद्धेय श्रीस्वामी समर्थ आणि आदिमाया स्वरूपाचे दर्शन घेऊन सैर समुद्रावर पोहोचली. तिथून ग्रामदैवत रामेश्वराचे दर्शन घेऊन सर्वजण मुक्कामी पोहोचले. मीना सामंत ,उषा पवार ,सुरेखा मोदी, हिरा कोरगावकर ,रजनी सावंत, अलका सापळे, नीतू पटेल यांच्या अभूतपूर्व गप्पाष्टकांना भरती आली होती तर हास्य- विनोद, चेष्टा-मस्करी,गजाली- गाणी यांच्या सानिध्यात बाबा परुळेकर, आबा सामंत, विजय कर्णीक, रवी बागवे ,दत्ता लाड बाबा हळदीवे, विनय सामंत,सतीश बिडये, दिवाकर सावंत, सुरेश कुडतरकर, बबन पवार, सुनील कोरगावकर, दिगंबर राणे, महादेव कुबल, बाळा नवले, बबन भालेकर, गणपत सुतार, अभिमन्यू मेस्त्री, पुरुषोत्तम सोलकर, सुधाकर कोरगावकर, सहदेव बागवे,सुभाष मसुरकर, विजय वणकुद्रे, रमेश पवार, सुरेश तळेकर यांनी स्नेह सोहळ्याची रंगत वाढविली. पुनम नवले हीचा वावर लक्षणीय होता. यावेळी शाळे प्रती कृतज्ञता व्यक्त करताना सहकार्य करण्याचे तसेच ग्रुप सदस्यांनी प्रत्येक वर्षी एक हजार रुपये जमा करून त्यातून ग्रुप कुटुंबियांना अथवा समाजातील गरजू घटकांना कर्ज सदृश्य मदत करून स्नेह- जिव्हाळा- ओढ आणि समाजभान राखण्याचे एकमताने ठरवण्यात आले.
मित्रवर्य सुरेश सामंत आणि प्रशालेच्या स्कूल कमिटी अध्यक्षपदी निवड होणाऱ्या बबन पवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.सोहळ्याची फोटोग्राफी करणारे सुजित सामंत, मैत्रीचे सर्वेसर्वा शिशिर परुळेकर व भोजन व्यवस्थापक बंटीचा विशेष गौरवोल्लेख करून सत्कार करण्यात आला. सुरेश कुडतरकर यांनी ग्रुपच्या निरामय आरोग्य अन स्वानंदासाठी ग्रामदैवतेकडे साकडे घातले. यानंतर पुढील वर्षी अगत्याने भेटण्याचा नोटवर पाणावलेल्या आसवांनी “बचपन के दोस्त” च्या वर्ग मित्र-मैत्रिणींनी एकमेकांचा निरोप घेतला.
