नागरिकांची उडाली तारांबळ…
दोडामार्ग ता.१९-:* तालुक्यातील अनेक गावात विजांच्या लखलखाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असून, आज रात्री उशिरा पावणे नऊ च्या दरम्याने पावसाने हजेरी लावली आहे. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विज पुरवठा देखील खंडित झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात उष्णतेची लाट आल्याने वातावरणात उष्णता वाढली होती. परंतु, आज सकाळ पासूनच वातावरण ढगाळ होते. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत.
