माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील रामेश्वर मंदिरात लघुरुद्र संपन्न …

मालवण दि प्रतिनिधी भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या ४२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवारी दि १७ मार्च रोजी कांदळगावच्या श्री देव रामेश्वर मंदिरात भाजप जिल्हा सरचिटणीस , माजी जि प अध्यक्ष अशोक सावंत यांच्या पुढाकाराने डॉ निलेश राणे यांच्या उपस्थितीत लघुरुद्र संपन्न झाला.

यावेळी उपस्थितानी ” येत्या निवडणूकीत प्रत्येकाच्या मनात चांगलो संचार कर आणि निलेश राणेंच्या मनात जे काय इच्छा आसत ते पूर्ण कर म्हाराजा !” असे गाऱ्हाणे घालत श्री देव रामेश्वराच्या चरणी सुयश चिंतिले दरम्यान, यावेळी भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांच्या उपस्थितीत निलेश राणेंचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण तालुका भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर आणि माजी सभापती उदय परब यांच्या संकल्पनेतून राणे कुटुंबियांचे कुलदैवत आणि तालुक्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, आशिष हडकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, माजी सभापती उदय परब, सरपंच सौ. उमदी परब, उपसरपंच आनंद आयकर सदस्या सौ. भाग्यश्री डिचवलकर, देवस्थानचे अध्यक्ष शिवराम परब, गोविंद परब, रूपेश कदम, उमेश कोदे, श्यामसुंदर मुळये, प्रसाद भोगले, लहू कदम, अनिल कदम, भाऊ गुरव, बाबजी परब, शशीकांत परब, संतोष परब, ओमकार परब, शशांक परब, नैनिश आंगणे, ओझर विद्यामंदिर मुख्याध्यापक प्रताप खोत, प्रविण पारकर, रवी मांजरेकर, मारुती मांजरेकर, मुख्याध्यापिका सौ. राणे, सौ. फर्नाडिस आदी उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे यांचे सकाळी रामेश्वर मंदिरात आगमन झाल्यानंतर अशोक सावंत, धोंडू चिंदरकर, बाबा परब, उदय परब यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर रामेश्वर मंदिरात लघुरुद्र करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांच्या भावी वाटचालीसाठी रामेश्वर चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर कांदळगाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत निलेश राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

निलेश राणें यांचा अशोक सावंत यांच्या हस्ते यथोचित सत्कार

निलेश राणेंच्या वाढदिवसा निमित्त भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने राणेंच्या उपस्थितीत रामेश्वर मंदिरात लघुरुद्र करण्यात आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निलेश राणेंचा केक कापण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या सत्काराने माजी खासदार निलेश राणे हे भारावून गेले होते

You cannot copy content of this page