१९ ते २७ मार्च कालावधीत राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब यांचे आयोजन;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची माहिती
सावंतवाडी ता.१८-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरात ‘मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ची मोफत सुविधा शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात घरोघरी याबाबतची माहिती देत जनजागृती करण्यात आली. उद्या १९ मार्च ते २७ मार्च पर्यंत स. १० ते सायं. ५ वाजेपर्यंत श्रद्धा सदन उभाबाजार सावंतवाडी इथं ही सुविधा उपलब्ध असणार असून शहरवासीयांना मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आहे.
