गावातील आजी माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली सोय…
सावंतवाडी ता.१८-:* एस्टी संपामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वेर्ले गावातील आजी माजी सैनिक संघटना धाऊन आली असून, गावातून परीक्षा केंद्रापर्यंत जाण्या येण्यासाठी एका गाडीची सोय केली आहे.
यावेळी या सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करत त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या संघटनेतील एकूण २३४ सदस्यांनी गावात सामाजिक उपक्रम राबवत भावी पिढीला देशभक्तीची प्रेरणा देऊन, शिक्षण आणि खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. तसेच गावातील निवृत्त सैनिक आणि वीर माताना समाजातील त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्याबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांना पेन्शन मिळण्यासाठी होणाऱ्या अडचणी एकूण घेऊन त्या अडचणी दूर करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्राम देवतेच्या मंदिराचे संघटनेच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवले आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
