काळया काचेचे गोड बंगाल काय?;मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा सवाल
*💫सावंतवाडी दि.०९-:* इन्सुली आरटीओ येथे परमिटच्या नावाखाली वाहतूकदारांकडून लूट केली जाते जर आरटीओ विभाग आपण पारदर्शक आहोत असे सांगत असतील तर ऑफिसला लावलेल्या काळया काचेचे गोड बंगाल काय?, असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केला आहे गवंडे म्हणाले, या सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन मध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यातच झालेला सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. इन्सुली आरटीओच्या ठिकाणाहून ओव्हरलोड वाहतूक केली जाते पण कुठलीही कारवाई होत नाही. तसेच मोठे कंटेनर थांबवले जातात आणि त्यांच्याकडून परमिट )च्या नावाने हजार हजार रुपये घेतले जातात. दिवसाढवळ्या या आरटीओ नाक्याच उत्पन्न हे एक लाखाच्या बाहेर आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०६ वाहनांच रजिस्ट्रेशन रद्द केलं त्याचा त्रास आरटीओमुळे वाहनधारकांना भोगावा लागतो. इन्सुली अारटीअोच्या ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत अन्यथा ते आरटीओ ऑफिस बांदा टोल नाका या ठिकाणी स्थलांतर करावे तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या आरटीओचे कारनामे आम्ही बाहेर काढू, असा इशाराही गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.
