एक जण ताब्यात; ६७लाख २९ हजार ६०० रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त
कुडाळ ता.१५-:* गोवा बनावटींच्या दारू वाहतुक करणाऱ्या ट्रकला वेताळ-बांबर्डे सृष्टी नर्सरी येथील गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग येथे पकडत सुमारे एकूण ६७ लाख२९ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला. तसेच या प्रकरणी एका ला ताब्यात घेण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 14 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ कार्यालयाला एका ट्रक मधुन गोवा बनावटीची दारूची वाहतुक करण्यात येणार असल्याची गुप्त माहीती मिळाली. या माहितीच्या आधारे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदूर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कुडाळ व कर्मचारी यांनी वेताळ-बांबर्डे, सापळा रचला. व काहीवेळातच गोव्याहुन मुंबईच्या दिशेने संशयित टाटा कंपनीचा तपकीरी रंगाचा ट्रक जात होता.
ये ट्रकला थांबवुन सदर वाहनाची दारुबंदी गुन्हयांतर्गत तपासणी केली असता गोवा बनावटी रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की या ब्रॅण्डच्या ८८० बॉक्समध्ये १८० मिली मापाच्या ४२२४० सिलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर मिळून आलेल्या गोवा बनावटीच्या मद्याची किंमत ५९ लाख १३ हजार ६०० रूपये एवढी आहे.
तसेच टाटा कंपनीचा तपकीरी रंगाचा ट्रक या वाहनाची किंमत ८ लाख रुपये असुन हा सुमारे ६७ लाख २९ हजार ६०० रु. किंमतीचा मुद्येमाल दारूबंदी गुन्हयातगत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. तसेच सदर कारवाईमध्ये संशयित इसम विनोद अनोखीलाल वर्मा (वय ३० वर्षे रा. मध्यप्रदेश) यांस वाहनासह जागीच ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील कारवाई अधीक्षक डॉ.बी.एच. तडवी यांच्या मागदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कुडाळ अमित पाडळकर, यांनी केली. सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक अमित जगताप, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकूर, एच. आर.वस्त जवान, वाहनचालक शरद साळुंखे जवान, मयुरी रविंद्र चव्हाण महिला जवान, यांनी मदत केली. या प्रकरणाचा अधिक तपास तपास अमित पाडळकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ करीत आहेत.
