“आमचा लोकनेता, निलेश राणे” टी-शर्टचे अनावरण

भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले अनावरण : कुडाळमध्ये जिल्ह्यास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

कुडाळ ता.१५-:* माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर “आमचा लोकनेता निलेश राणे” या नावाने टी – शर्टचे अनावरण भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून, माजी खासदार निलेश राणे यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेवेळी मंडळाचे सदस्य आणि निलेश राणे यांचे कार्यकर्ते ही टी – शर्ट परिधान करणार असून, यावेळी मैदानात वेगवेगळे देखावे देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ एस्टी डेपो मैदानावर न भूतो न भविष्यती अशा जिल्ह्यास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत निमंत्रित १६ संघ सहभागी होणार आहेत.

You cannot copy content of this page