देवगड मधील बेकरी आणि कपड्याच्या दुकानात चोरी…

सुमारे २५ हजार रुपयांसह मिठाई आणि कपड्यांची चोरी; पोलिसात तक्रार दाखल

देवगड ता.१५-: देवगड कॉलेज रोड येथील न्यू रॉयल बेकरी,आणि सोहम कलेक्शन या दुकानात अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्याचप्रमाणे सीसीटीव्हीची नासधूस करून या दुकानातील सुमारे २५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच रेडिमेड गारमेंट खाद्यपदार्थांची चोरी केल्याची घटना मंगळवारी देवगड येथे घडली.

यासंदर्भात देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर,दयाळ गावकर ,दयानंद पाटील,महेश घारे,श्याम बांदकर,दिनेश पटेल, मिलिंद मोहिते, या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व या चोरीप्रकरणी तात्काळ तपास जलद गतीने व्हावा अशी आग्रही मागणी केली या अनुषंगाने झालेल्या चर्चेत आवश्यक ती कार्यवाही देवगड पोलीस स्थानकामार्फत करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक यांनी प्रामुख्याने आवश्यक असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे त्याचप्रमाणे बाजारपेठ मध्ये गुरखे नेमण्यात यावेत अशी सूचनाही पोलीस निरीक्षक आणि शिष्टमंडळाला केली.

You cannot copy content of this page