माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा

कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात लघुरुद्राचे आयोजन : अशोक सावंत यांची माहिती.

*⚡मालवण ता.१५-:* भाजप प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात प्रत्येक विभागात सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १७ मार्च रोजी कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात सकाळी साडे सात वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लघुरुद्र व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत आणि मालवण भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिनांक १७ मार्च रोजी विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती देताना भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले मालवण तालुक्यात प्रत्येक विभागात निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा होणार आहे यात रक्तदान शिबीर, इ श्रम कार्ड वाटप, आरोग्य शिबीर, क्रीडास्पर्धा, आधारकार्ड समस्या, रुग्णांना फळ वाटप विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ यांचा अंतर्भाव आहे तसेच प्रत्येक विभागातील कार्यकर्त्याना निलेश राणे यांना मालवण कुडाळ मतदार संघातील उमेदवार म्हणून जबाबदारी देऊन पक्षसंघटना अधिक बळकट व्हावी यासाठी मागणी केली जाणार असल्याची माहितीही श्री चिंदरकर यांनी दिली. कांदळगाव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र व धार्मिक कार्यक्रम माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे व कुटुंबीय यांचे गाव असलेल्या कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ लघुरुद्र व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत आणि मालवणचे माजी सभापती उदय परब व भाजपा पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page