राजन तेली यांच्या मध्यस्थीनंतर घेतले मागे
*⚡सावंतवाडी ता.१५-:* आंबोली गेळे येथील ग्रामस्थांना भेडसावणारा कबुलायतदार प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी पुकारलेले धरणे आंदोलन अखेर सायंकाळी उशिरा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मध्यस्तीनंतर ग्रामस्थांनी मागे घेतले आहे. यावेळी हा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी शासन स्तरावर नव्याने सकारात्मक प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन प्रांताधिकारी यांनी ग्रामस्थांना दिले आहे.
तर याबाबत योग्य निर्णय होई पर्यंत शेती, बागायती, घरे, मांगर बांधण्यास तसेच शेती पूरक व्यवसाय करण्यास वन विभागाकडून अडवणूक केली जाणार नाही, असे आश्वासन उपवन संरक्षक शहाजी नारनवर यांनी यावेळी दिले आहे.
